केरळमध्ये प्रलयंकारी पाऊस : डोंगर चिरून तयार झाली नदी

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑक्टोबर । केरळमध्ये रविवारी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर प्रलयंकारी पाऊस आणि भूस्खलनाच्या विध्वंसाचे चित्र समोर येत आहे. राज्यात आतापर्यंत २१ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण बेपत्ता आहेत. सैन्यदल, हवाई दल व नौदलासह एनडीआरएफ बचावकार्य करत आहे. एनडीआरएफने ८ महिला व ७ मुलांसह ३३ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. हवामान खात्याने म्हटले की, हळूहळू पाऊस कमी होईल. इडुक्कीच्या पिरुमेडूत शनिवारी ११ इंचांवर पाऊस झाला.

कोट‌्टायममध्ये भूस्खलनामुळे निर्माण झालेल्या नदीत अनेक घरे बुडाली.
– कोट्टायम, इडुक्की, पथनमथिट्टा जिल्ह्यातील डोंगरी भागात २०१८- २०१९ मधील पुरासारखी स्थिती.
– २ तासांत २ इंचांपेक्षा जास्त पाऊस. त्यावरून केरळमध्ये ढगफुटी झाल्याचा कोचिन विद्यापीठाचा दावा.
– पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्याशी चर्चा.
– हिमाचल : रोहतांग, लाहौल स्पिती, मनालीच्या शिखरांवर बर्फवृष्टी

२१ जणांचा मृत्यू, तज्ज्ञांचे मत-ढगफुटीमुळे पाऊस
– हिमाचल प्रदेशच्या पर्वतीय भागांत हिमवृष्टी. पर्वतीय भागांत थंडी वाढली.
– सिमल्यासह मैदानी भागांत रविवारी दिवसभर पाऊस सुरू होता.
– उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये बर्फवृष्टी, सोमवारी शाळांना सुटी, ट्रेकिंग बंद.
– दिल्लीतही रविवारी जोरदार पाऊस. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *