Deprecated: Function WP_Dependencies->add_data() was called with an argument that is deprecated since version 6.9.0! IE conditional comments are ignored by all supported browsers. in /home/x5zz1zyaiadw/public_html/wp-includes/functions.php on line 6131
आजपासून आयआयसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ ; विंडीज-इंग्लंड यांच्यात आज लढत - Maharashtra 24

आजपासून आयआयसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला प्रारंभ ; विंडीज-इंग्लंड यांच्यात आज लढत

Spread the love

Loading

आयआयसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला शनिवारी प्रारंभ होत आहे. आतापर्यंत दोनवेळा या स्पर्धेचे जेतेपद मिळविणाऱया विंडीज संघाचा सलामीचा सामना इंग्लंडबरोबर होणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी 7.30 वाजता प्रारंभ होईल. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सूर मिळविण्यासाठी झगडत असलेल्या विंडीज संघाची सत्त्वपरीक्षा ठरणार आहे.

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑक्टोबर । आयसीसीच्या या स्पर्धेमध्ये एकूण 12 संघांचा समावेश आहे. विंडीज संघामध्ये आक्रमक फलंदाजांचा समावेश अधिक असला आहे. पोलार्डच्या नेतृत्त्वाखाली विंडीज संघाला इंग्लंडकडून कडवे आव्हान मिळेल, अशी अपेक्षा आहे. या स्पर्धेपूर्वी झालेल्या दोन सरावाच्या सामन्यात विंडीजचे फलंदाज सूर मिळविण्यासाठी झगडत असल्याचे चित्र पहावयास मिळाले.

कमकुवत फलंदाजीमुळे या सरावाच्या सामन्यात विंडीजच्या फलंदाजांनी निराशा केली. पाकविरुद्धच्या पहिल्या सरावाच्या सामन्यात विंडीजने 20 षटकात केवळ 7 बाद 130 धावापर्यंत मजल मारली होती. तर अफगाणविरुद्धच्या दुसऱया सरावाच्या सामन्यात विंडीजने 20 षटकात 5 बाद 133 धावा जमविल्या होता. या सामन्यात अफगाणने विंडीजला विजयासाठी 189 धावांचे आव्हान दिले होते. विंडीज संघातील रॉस्टन चेसने 58 चेंडूत 54 धावा फटकाविल्या पण, विंडीजचे इतर फलंदाज अधिक धावा जमू शकले नाही. पाकविरुद्ध सामन्यात कर्णधार पोलार्डने 10 चेंडूत 5 चौकारांसह 23 धावा जमविल्या होत्या.

शनिवारी होणाऱया सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवायचा असेल तर विंडीज संघातील लेविस, सिमॉन्स, हेटमेयर, पुरन यांना आक्रमक फटकेबाजी करावी लागेल. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविण्यासाठी प्रत्येक गटातील संघाला प्राथमिक फेरीतील किमान 3 सामने जिंकावे लागतील. सलामीचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल फलंदाजीत सूर मिळविण्यासाठी झगडत आहे. कॅरेबियन प्रीमियर लिग क्रिकेट स्पर्धेत गेलने 9 डावात केवळ 165 धावा जमविल्या असून त्याने आयपीएल स्पर्धेतील संयुक्त अरब अमिरात येथे झालेल्या दुसऱया टप्प्यात पंजाब संघाकडून दोन सामन्यात खेळ केला. पण त्याला अधिक धावा जमविता आल्या नाहीत. अनुभवी अष्टपैलू आंद्रे रसेलसमोर तंदुरुस्तीची समस्या भेडसावत आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेतील दुसऱया टप्प्यात या दुखापतीमुळे रसेल केवळ तीन सामन्यात कोलकाता संघाकडून खेळ केला होता.

सरावाच्या पहिल्या दोन सामन्यामध्ये फलंदाजीच्या तुलनेत विंडीजची गोलंदाजी थोडी फार समाधानकारक म्हणावी लागेल. हेडन वॉल्श आणि मॅकॉय यांच्यावर विंडीजच्या गोलंदाजीची मदार राहील. मात्र थॉमसची फिरकी म्हणावी तशी प्रभावी वाटत नाही. ऍलेन, चेस, पोलार्ड आणि अकिल हुसेन हे विंडीज संघातील प्रमुख गोलंदाज आहेत.

इंग्लंड संघाची स्थिती या स्पर्धेसाठी समतोल असल्याचे जाणवते. मॉर्गनच्या नेतृत्त्वाखाली इंग्लंड संघाला या स्पर्धेसाठी अष्टपैलू स्टोक्स, आर्चर आणि सॅम करेन यांची उणीव निश्चितच भासेल. इंग्लंड संघाला पहिल्या सरावाच्या सामन्यात भारताकडून पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर दुसऱया सरावाच्या सामन्यात त्यांनी न्यूझीलंडवर मात केली. प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजीवर दबाव आणण्याचे तंत्र इंग्लंड संघातील रॉय, बटलर, बेयरस्टो यांच्याकडे आत्मसात आहे. मोईन अली, टॉम करेन, जॉर्डन, बिलिंग्स हे उपयुक्त फलंदाज आहेत. मार्क वुड, वोक्स, विली, आदिल रशीद आणि मोईन अली यांच्यावर गोलंदाजीची भिस्त राहील. न्यूझीलंडविरुद्ध सरावाच्या सामन्यात मार्क वूड, रशिद यांची गोलंदाजी प्रभावी झाली होती.

विंडीज- पोलार्ड (कर्णधार), पुरन, ऍलेन, ड्वेन ब्रॅव्हो, चेस, फ्लेचर, गेल, हेटमेयर, लेविस, मॅकॉय, सिमॉन्स, रामपॉल, रसेल, थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर.

इंग्लंड- मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, बेयरस्टो, बिलिंग्स, बटलर, टॉम करेन, जॉर्डन, लिव्हिगस्टोन, मॅलेन, मिल्स, आदिल रशिद, जेसन रॉय, विली, वोक्स आणि मार्क वुड.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *