आपल्या Android फोनचे स्टोरेज कसे क्लिअर कराल, जाणून घ्या स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । बाजारामध्ये भरपूर स्टोरेज स्पेस असलेले अनेक स्मार्टफोन उपलब्ध आहेत. परंतु जर तुमच्या डिव्हाइसची स्टोरेज स्पेस 128 जीबी किंवा 64 जीबीपेक्षा कमी असेल तर हेवी गेम किंवा फाइल्स डाऊनलोड केल्यानंतर तुम्हाला ‘आउट ऑफ स्टोरेज’ मेसेज येतो. Android स्मार्टफोन्सची चांगली गोष्ट म्हणजे कस्टमाइजेशन ऑप्शन बरेच मिळतात. पण त्यासोबत थोडी त्रासदायक गोष्ट म्हणजे आपल्या फोनमधील मेमरी हळूहळू फुल होत जाते.

आपण काही सोप्या टिप्स फाॅलो करून फोनमधील स्टोरेज कमी करू शकता आणि फोनचा परफॉर्मेंस चांगला करू शकता. तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमधील सर्व फाईल्स आणि अॅप्स असणे आवश्यक वाटू शकते आणि तुम्हाला काहीही डिलिट करायचे नसेल तर आपण फोनची मेमरी काही सोप्पा टिप्स फाॅलो करून वाढवू शकतो.

स्मार्टफोनमधील स्टोरेज कसे कमी करायचे

-तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जा

-स्टोरेज निवडा

-तुमच्या फाईलमध्ये जा आणि किती मेमरी शिल्लक आहे, हे बघा

-‘फ्री अप स्पेस’ पर्यायावर क्लिक करा

तुम्हाला गुगल फाइल्स अॅप किंवा ‘रिमूव आइटम’ फीचर निवडण्याचा पर्याय मिळेल.
रिमूव आइटम तुम्ही बॅकअप घेतलेले फोटो आणि व्हिडिओ हटवण्याचा पर्याय देते.
याव्यतिरिक्त, आपण डाउनलोड केलेल्या फायल आणि कमी वापरलेले अॅप्स देखील काढू शकता.

कॅश मेमरी क्लिअर करा

फोनची बहुतेक मेमरी कॅशमध्ये जाते. यामुळेच सर्वात अगोदर कॅश मेमरी क्लिअर करा. यासाठी सेटिंग्जमध्ये जा आणि स्टोरेज वर जा. येथे तुम्हाला कॅश दिसेल. ते सर्वात अगोदर क्लिअर करून घ्या. ते तुमच्या कोणत्याही फायली हटवणार नाही. याव्यतिरिक्त स्मार्ट स्टोरेज टॉगलद्वारे तुमच्या स्मार्टफोनचे स्टोरेज क्लिअर होईल. जेव्हा ‘स्मार्ट स्टोरेज’ टॉगल चालू केले जाते, डिव्हाइस 30, 60 किंवा 90 दिवसांनी बॅक अप केलेले फोटो आपोआप हटवले जातात.

स्मार्टफोनमधून अनावश्यक अॅप्स कसे काढायचे

तुमच्या डिव्हाइसवर Play Store उघडा. आता वरच्या डाव्या कोपऱ्यातून मेनू उघडा आणि ‘माय अॅप्स आणि गेम्स’ वर जा. तेथे शेवटचा पर्याय निवडा. तुम्ही सर्वाधिक वापरलेले अॅप्स वर दाखवले जातील. लिस्टमध्ये खाली दिलेले म्हणजे तुम्ही सर्वात कमी वापरलेल अॅप्स डिलीट करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *