T20 WC IndvsPak: कोणतीही टीम हा सामना जिंकल्यास इतिहास ; जाणून इंटरेस्टींग कारण …

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑक्टोबर । T20 वर्ल्डकप यंदा दुबईमध्ये खेळवला जातोय. आज या स्पर्धेत हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे. दुबईच्या मैदानावर टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान 7व्या वेळी आमनेसामने येतील. संपूर्ण जगाच्या नजरा या महान सामन्यावर खिळल्या आहेत. दोन्ही देशांच्या प्रेक्षकांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड उत्साह आहे. वर्ल्डकपच्या स्पर्धेत अजूनही भारताने कधीही पाकिस्तानकडून हार पत्करलेली नाही. तर आज कोणतीही टीम हा सामना जिंकल्यास इतिहास नक्कीच बदलेल. आज इतिहास कसा बदलेल हे जाणून घेऊ या.

बाबर आझमने यूएईच्या खेळपट्ट्यांवर 11 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. या 11 सामन्यांमध्ये त्याचा विजयाचा विक्रम 100 टक्के राहिला आहे. म्हणजेच पाकिस्तानच्या कर्णधाराने UAE मध्ये खेळलेले सर्व 11 T-20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. पण आज हे चित्र बदलू शकतं. भारताकडे असे काही खेळाडू आहेत, जे सामन्याचे फासे कधीही बदलू शकतात. भारताने आज पाकिस्तानविरुद्ध विजया मिळवला तर पाकिस्तानचा विजय रथ थांबेल आणि आज इतिहास बदलेल.

आज टीम इंडिया टी -20 विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा सामना करणार आहे. टी -20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 5 सामने झाले आहेत. ज्यामध्ये आजपर्यंत पाकिस्तान भारताकडून जिंकलेला नाही. आजच्या सामन्यातही तो आपली आघाडी कायम राखू शकतो. पण कुठेतरी भारतीय संघ उलटफेरीचा बळी ठरला, तर टी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तान भारताविरुद्ध पहिला विजय नोंदवेल आणि इतिहास बदलेल.

जगभरातील चाहते या सामन्यात इतिहास बदलण्याची वाट पाहत आहेत. या हायव्होल्टेज सामन्यात पाकिस्तानने विजय मिळवला, तर विश्वचषकातील भारताविरुद्धचा हा त्यांचा पहिला विजय असेल. दुसरीकडे, भारताने विजयाची नोंद केली, तर यूएईमध्ये पाकिस्तानची विजयी मोहीम थांबेल. आजचा सामना कोणताही संघ जिंकला तर इतिहास नक्कीच बदलेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *