टेक टॉक – शाओमीच्या वायरलेस चार्जरद्वारे अवघ्या 40 मिनिटांमध्ये 4,000 एमएएच बॅटरी फूल चार्ज होणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- मुंबई
स्मार्टफोन कंपनी शाओमी आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन डिव्हाईस लाँच करत असते. कंपनीने आता एक खास सुपरफास्ट वायरलेस चार्जर सादर केला आ. या चार्जरद्वारे अवघ्या 40 मिनिटांमध्ये 4,000 एमएएच बॅटरी फूल चार्ज होईल. शाओमीचे वॉइस प्रेसिडेंट चांग चेंग यांनी चीनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाईट वेईबोवर या 40 W वायरलेस फास्ट चार्जरबाबत माहिती दिली. यासोबतच एक व्हिडीओ देखील शेअर करण्यात आला असून, यात हा नवीन चार्जर एमआय 10 प्रो स्मार्टफोनवर टेस्ट करण्यात आला.

व्हिडीओमध्ये स्मार्टफोनला फुल चार्ज करण्यासाठी लागणार वेळ रेकॉर्ड करण्यात आलेला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, या चार्जरद्वारे 20 मिनिटात 4000एमएएच बॅटरी 57 टक्के चार्ज होते. तर फुल चार्ज होण्यास 40 मिनिटे लागतात. या वायरलेस चार्जरसोबतच वर्टिकल एअर-कूलर देखील येणार आहे. जे टेम्प्रेचर नियंत्रणात ठेवण्याचे काम करेल. हा वायरलेस चार्जर बाजारात कधी उपलब्ध होणार याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही. कंपनीने मागील वर्षी एमआय 9 प्रो 5जी स्मार्टफोनसोबत 30W वायरलेस चार्जिंग सॉल्यूशन देखील सादर केला होता. याला कंपनीने एमआय चार्ज टर्बो असे नाव दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *