एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता ‘नमस्ते’ करा अन् करोनापासून बचाव करा’

Spread the love

महाराष्ट्र 24 – मुंबई: नवी दिल्लीः करोना हा साथीचा रोग असल्याने इतरांच्या संपर्कात येताच दुसऱ्यालाही लागण होते. यामुळे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी आपल्या देशातील जनतेला भारतीय पद्धव अवलंबण्याची सूचना केलीय. एकमेकांना भेटल्यावर हस्तांदोलन न करता भारतीय पद्धत म्हणजे ‘नमस्ते’ करा, असं नेतान्याहू म्हणाले.

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नेतान्याहू यांनी एक आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी उपाययोजनांची माहिती देण्यापूर्वी नागरिकांना एक आवाहन केलं. ‘काही सोप्या गोष्टी आहेत. ज्या केल्यावर करोनाचा संसर्ग होण्यापासून नागरिक वाचू शकतात,असं ते म्हणाले. नेतान्याहू यांनी पत्रकार परिषदेत दोन्ही हात जोडले आणि ‘नमस्ते’ केलं. हस्तांदोलन करण्याऐवजी ‘नमस्ते’ करा, असं नेतान्याहू यावेळी म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *