आत्मनिर्भर भारत ; ई-कॉमर्सद्वारे देश-विदेशात जाणार ग्रामीण उत्पादने

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३ नोव्हेबर । नवी दिल्ली : ग्रामीण महिला व स्वयं सहायता समूहांनी तयार केलेली ग्रामीण उत्पादने लवकरच ई-कॉमर्सच्या माध्यमातून जगभरातील कोट्यवधी लोकांना उपलब्ध होईल.आत्मनिर्भर भारत अभियानांतर्गत ग्रामीण उत्पादकांना नवीन बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी व गावांमधील स्वरोजगाराला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने ई-कॉमर्सचा मार्ग अवलंबिला आहे. यासाठी दिग्गज ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टशी करार केला आहे.

या योजनेंतर्गत २८ राज्ये व ६ केंद्रशासित प्रदेशांतील ७०६ जिल्ह्यांतील ६७६८ ब्लॉकमध्ये ७.८ कोटी महिलांकडून चालविल्या जात असलेल्या ७१ लाख स्वयंसहायता समूहांना समाविष्ट करण्यात आले आहे. ही योजना गावांतील गरीब महिलांना आर्थिक रूपाने सशक्त बनविण्याचे काम करीत आहे. अशा महिलांचे उत्पन्न, जीवनस्तर सुधारण्यासाठी वित्तीय, आर्थिक व सामाजिक उत्थानासाठी सेवा दिल्या जातात. मंत्रालयाचे संयुक्त सचिव चरणजित सिंह यांनी सांगितले की, कोरोनानंतरच्या वातावरणात फ्लिपकार्टशी समझोता केल्यामुळे ग्रामीण भागातील स्वयंरोजगार व व्यावसायिक विकासासाठी आवश्यक संसाधने जोडण्यासाठी तसेच त्यांचा उपयोग करण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

वार्षिक उत्पन्न एक लाख रुपये करणार
@ ग्रामीण विकास मंत्री गिरीराज सिंह यांनी सांगितले की, महत्त्वाकांक्षी दीनदयाळ अंत्योदय योजना-एनआरएलएम ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी लागू केली आहे.
@ स्वयंसहायता समूहांचे उत्पन्न वाढवून वर्षाला एक लाख रुपये करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *