महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ नोव्हेबर । दिवाळीच्यानिमित्ताने (occasion of Diwali) दरवर्षीप्रमाणे बारामतीमध्ये (Baramati) पवार कुटुंबियांना (Pawar family) दिवाळीच्या शुभेच्छा (happy Diwali) देण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या संख्येने आले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या बारामती येथील माळेगाव येथील आप्पासाहेब पवार सभागृहात आज यात्रेचं स्वरूप आलं आहे. आज झालेल्या दिवाळी भेट कार्यक्रमास कार्यकर्त्यांची मोठी झुंबड झाली आहे. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या कार्यक्रमास अनुपस्थित असल्याचं दिसून येत आहे.
शरद पवार यांच्यासह खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी कार्यकर्त्यांच्या शुभेच्छा स्वीकारत येणारं वर्ष सुखसमृद्धीचं जावो अशा सदिच्छा दिल्या. मात्र या कार्यक्रमास यंदा अजित पवार गैरहजर आहेत. आताच समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्या स्टाफमधील तीन जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समजतंय.. त्यामुळे कदाचित अजित पवार आले नसल्याचं सांगण्यात येत आहे.
स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या शुभेच्छा स्वीकारत आहेत. वर्षातून एकदा संपूर्ण पवार कुटुंबियांना भेटण्याची संधी उपलब्ध होत असल्यानं कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच सभागृहात गर्दी करत दीपावलीच्या शुभेच्छा देत आहेत. यंदा भेटण्याच्या स्थळात थोडासा बदल करण्यात आला असून पवार कुटुंबिय दिवाळीच्या पाडव्याला गोविंदबाग या शरद पवार यांच्या निवासस्थानाऐवजी लगतच असलेल्या डॉ. आप्पासाहेब पवार सभागृहात लोकांना भेटत आहेत.
गेल्यावर्षी कोरोना व्हायरसच्या महामारीमुळे बारामतीमधील दिवाळी कार्यक्रम रद्द करावा लागला होता. त्यामुळे दरवर्षी दिवाळीत भेटण्यासाठी, शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधु-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरुनच शुभेच्छा द्याव्यात, असं आवाहन पवार कुटुंबाकडून करण्यात आलं होतं.