महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. 6 नोव्हेबर । सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. आज सलग दुसऱ्या दिवशी इंधनाच्या दरात (Petrol-Diesel Price Today) कोणतीही वाढ झालेली नाही. 6 नोव्हेंबर 2021 रोजी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. मुंबईत आज पेट्रोलचे दर 109.98 रुपये आणि डिझेलचे दर 94.14 रुपये प्रति लीटरवर पोहोचले आहेत. दिवाळी दिवशी 4 नोव्हेंबर 2021 रोजी इंधन दरात कपात (Fuel Price Cut) झाली होती.
दिवाळी्या मुहुर्तावर मोदी सरकारने (modi government decision on petrol diesel excise duty) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पेट्रोलच्या दरात 5 रुपये आणि डिझेलच्या दरात 10 रुपये उत्पादन शुल्क कर (Petrol-Diesel Excise Duty Cut) कमी केला आहे. याचा परिणाम इंधनाच्या किंमतीवर होऊन दर उतरले आहेत.
चार महानगरातील पेट्रोल-डिझेलचे दर (Petrol Diesel Price on 4 November 2021)
@ दिल्ली पेट्रोल 103.97 रुपये आणि डिझेल 86.67 रुपये प्रति लीटर
@ मुंबई पेट्रोल 109.98 रुपये आणि डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
@ चेन्नई पेट्रोल 101.40 रुपये आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटर
@ कोलकाता पेट्रोल 104.67 रुपये आणि डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर
हे वाचा-मुहूर्त ट्रेडिंगमध्ये राकेश झुनझुनवालांनी तासाभरात कमावले 101 कोटी!
दररोज सकाळी 6 वाजता बदलते किंमत
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते