महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .६ डिसेंबर । कोरोना व्हायरसचा (Corona virus) नवीन Omicron व्हेरिएंटनं सर्वांचीच चिंता वाढवली आहे. राज्यातही ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आठ रुग्ण आढळून आले आहेत. आरोग्य विभागही (Health Department) अलर्ट झाली आहे. अशातच पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांनी राज्यातील ओमायक्रॉन परिस्थिती संदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यातच सर्वांत महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) आणि टास्क फोर्स (Task Force) यांच्यामध्ये ओमायक्रॉन संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडणार असल्याची माहिती आदित्य ठाकरेंनी दिली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि टास्क फोर्स यांच्यात आज रात्री होणाऱ्या बैठकीत ओमायक्रॉन आणि प्रतिबंधात्मक मार्गदर्शक तत्त्वांवर चर्चा केली जाईल, असं आदित्य ठाकरेंनी सांगितलं आहे.
लोकांनी केंद्र सरकारनं, शहरी स्थानिक पालिकांनी दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करावं, अशी विनंतीही यावेळी आदित्य ठाकरेंनी केली आहे. ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. आम्ही केवळ विमानतळांवर, एंट्री पॉइंट्सच नाहीतर शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात चाचणी करत असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
दर आठवड्याला कॉर्पोरेट कार्यालयांनी RT PCR करावं असं म्हणत ज्यांनी अद्याप लस घेतलेली नाही, त्यांनी लसीकरण करणं आवश्यक असल्याचंही ते म्हणालेत.
अधिक निर्बंध घालण्यासाठी आम्ही आता दोन ते तीन दिवस निरीक्षण करू, असंही आदित्य ठाकरेंनी म्हटलं आहे. मात्र घाबरण्याची गरज नाही. पण आरोग्याबाबत चिंता असावी, असंही ते सांगायला विसरले नाहीत.
सरकारनं नियम कडक केले आहेत. सरकारकडून अतिरिक्त नियम लागू करण्यात आले आहेत. आम्ही वेळेवर पुनरावलोकन करत राहू, असं त्यांनी सांगितलं आहे.