केंद्र सरकारच्या ‘या’ विशेष सवलतीचा मिळवा लाभ, 15 डिसेंबरपर्यंत संधी!

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । तुम्‍हाला सरकारी मदत घेऊन तुमचा व्‍यवसाय सुरू करायचा असेल तर 15 डिसेंबरपर्यंत तुम्‍हाला मोठी संधी आहे. त्यानंतर या कर्जाच्या व्याजावरील विशेष सवलत बंद होईल. दरम्यान, ज्या लोकांना नवीन आयडियासोबत आपला रोजगार सुरू करायचा आहे, ते मुद्रा योजनेअंतर्गत (Mudra Yojana) कर्ज घेऊन आपली स्वप्ने साकार करू शकतात.

मोदी सरकारने 8 एप्रिल 2015 रोजी मुद्रा योजना सुरू केली होती. प्रधानमंत्री मुद्रा योजनेंतर्गत, देशातील तरुणांना बँकांकडून हमीशिवाय कर्ज दिले जाते, जेणेकरून ते रोजगार प्रदाता म्हणजेच नोकरी देणारे बनू शकतील. मुद्रा योजनेत तीन प्रकारची कर्जे दिली जातात. शिशु मुद्रा कर्ज (50,000 रुपयांपर्यंत), किशोर मुद्रा कर्ज (50,001 ते 5 लाख रुपयांपर्यंत) आणि तरुण मुद्रा कर्ज (5,00,001 ते 10 लाख रुपयांपर्यंत) दिले जातात.

देशात सर्वाधिक शिशू कर्ज मुद्रा योजनेअंतर्गत वितरित करण्यात आली आहेत. जवळपास 88 टक्के शिशू कर्ज देण्यात आले आहे. शिशू कर्ज अंतर्गत जास्तीत जास्त 50,000 रुपयापर्यंत कर्ज मिळते. विशेषत: छोटे व्यावसायिक या योजनेचा लाभ घेत आहेत. त्यामुळे या कर्जावर आतापर्यंत विशेष सूट देण्याची तरतूद आहे. ज्याची अंतिम तारीख 15 डिसेंबर आहे.

पीएम मुद्राच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, सरकारने 2 टक्के व्याज सवलत योजनेच्या लाभार्थ्यांसाठी 15 डिसेंबर ही अंतिम तारीख केली आहे. 31 डिसेंबर 2021 पासून पीएमएमवाय पोर्टल व्याज सहायता स्कीम (ISS) क्मेमसाठी बंद केले जाईल. अशा परिस्थितीत, शिशू कर्जाचे कर्जदार 15 डिसेंबरनंतर 2 टक्के व्याज सवलत योजनेसाठी दावेदार नसतील.

दरम्यान, पीएमएमवाय हे एक राष्ट्रीय मिशन आहे, ज्याचा उद्देश स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी कर्ज देणे आणि लहान उद्योजकांना रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहित करणे हा आहे. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *