याला म्हणतात नशीबवाण ! अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर…२७० रूपयाच्या लॉटरीनं पालटलं नशीब

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ डिसेंबर । पश्चिम बंगालच्या पूर्व बर्धमान जिल्ह्यात राहणारा अ‍ॅम्ब्युलन्स ड्रायव्हर शेख हीरा याने सकाळी उठून १ कोटी रुपयांचे जॅकपॉट लॉटरीचे तिकीट केवळ २७० रुपयांना खरेदी केलं. पण बघता बघता दुपारपर्यंत तो कोट्यधीश झाला होता. खरं तर, १ कोटींचा जॅकपॉट जिंकल्यानंतर तो इतका भारावून गेला होता की तो थेट पोलिस स्टेशनला सल्ला घेण्यासाठी गेला. लॉटरीचे तिकीट हरवण्याची भीतीही त्याच्या मनात होती. अखेर शक्तीगड पोलिसांनी त्याला सुखरूप घरी पोहोचवलं. आता त्याच्या घरी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शेख हिरा यांची आई आजारी आहे. तिच्या उपचारासाठी त्याला पैशांची खूप गरज होती. पण नशीबाने अचानक दिलेल्या या सुखद धक्क्याने या सामान्य रुग्णवाहिका चालकाला खात्री आहे की आता त्याची आई लवकरच बरी होईल. “मी नेहमी एक दिवस जॅकपॉट जिंकण्याचं स्वप्न पाहायचो आणि तिकीट खरेदी करत राहिलो. शेवटी नशीब माझ्याकडे बघून हसलं,” असं प्रतिक्रिया देताना शेख म्हणाला.

इतक्या साऱ्या पैशाचं काय करणार?, असं विचारल्यावर शेख म्हणाला की, तो एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे आणि त्याच्या आर्थिक समस्या दूर झाल्या आहेत. सध्या त्याला त्याच्या आईवर सर्वोत्तम उपचार करता येऊ लागले आहेत. त्याच्या आईसाठी आणि राहण्यासाठी एक चांगलं घरही ते बांधणार आहे. यापेक्षा जास्त काही विचार काही केलेला नाही, असं शेख म्हणाला.

भाग्यवान लॉटरीचे तिकीट विकणारे शेख हनीफ म्हणाले, “मी अनेक वर्षांपासून लॉटरीच्या तिकीटाचा व्यवसाय करत आहे. बरेच लोक माझ्या दुकानातून तिकिटे खरेदी करतात. काही बक्षिसे अधूनमधून मिळतात. पण असं जॅकपॉट बक्षीस माझ्या दुकानातून यापूर्वी कधीही आलं नव्हतं. आज मला खूप आनंद झाला की जॅकपॉट विजेत्याने माझ्या दुकानातून तिकीट खरेदी केलं आहे.”

एका रूग्णवाहिका चालकासाठी १ कोटी रुपयांची रक्कम देखील कमी नाही. रातोरात कोट्यधीश होणारा रूग्णवाहिका चालकाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे. मात्र, तरीही एवढी मोठी रक्कम मिळाल्यानं शेख आणि त्याचे संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. कारण, एक दिवस आपलं नशीब असं बदलेल याची त्यांनी कल्पनाही केली नव्हती. सोशल मीडियावर सध्या शेख हीराची बरीच चर्चा रंगलीय. एका रात्रीत तो करोडपती तर झालाच आहे पण सोबतच सोशल मीडियावर रातोरात सोशल मीडिया स्टार सुद्धा झालाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *