महाराष्ट्र २४ ऑनलाईन ; पुणे – विविध प्रकारच्या वस्तूंच्या खरेदीसाठी महिलांच्या आवडीचे व हक्काचे ठिकाण असलेले तुळशीबाग सोमवारपासून पुढील तीन दिवस बंद राहणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विश्रामबाग पोलिसांनी केलेल्या आवाहनास तुळशीबाग छोटे व्यापारी असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद देत दिला.
पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी रविवारी रात्री आठला दुकानदार व छोटे व्यावसायिक असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्यांची भेट घेतली. तुळशीबागेतील ग्राहकांची गर्दी लक्षात घेऊन, पुढील तीन दिवस तुळशीबाग बंद ठेवण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत असल्याचे संघटनेचे उपाध्यक्ष विनायक कदम यांनी सांगितले.