ऐन थंडीत पुण्याचं राजकीय वातावरण तापलं; भाजपची होर्डिंग बाजी विरोधकांकडून टार्गेट

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१९ डिसेंबर । देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा आज पुणे दौरा आहे. आणि यावरून पुण्यातील (Pune) राजकीय वातावरण ऐन थंडीत चांगलेच तापले आहे. त्याला कारण ठरलंय या दौऱ्यासाठी पुणे शहरात भाजपने (BJP) केलेली होर्डिंगबाजी. या दौऱ्यात छत्रपती शिवरायांच्या (chhatrapati shivaji maharaj) पुतळ्याचे भूमिपूजन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) यांच्या पुतळ्याचे अनावरण पुणे महापालिकेत (Municipal Corporation) होत आहे.

मात्र, होर्डिंग लावताना त्यात या दोन्ही महापुरुषांचा फोटो (Photo) भारतीय जनता पक्षाने छापलेला नाहीये आणि हाच धागा पकडून पुण्यातील विरोधकांनी भाजपला टार्गेट केले आहे. या होर्डिंगबाजीचे पडसाद पुणे महापालिकेच्या सभागृहातही उमटले आहेत.

भाजपने केलेल्या होर्डिंगबाजीचा राष्ट्रवादी (NCP), काँग्रेस (Congress) आणि मनसेने (MNS) सभागृहात आंदोलन करून निषेध करण्यात आला आहे. हे होर्डिंग म्हणजे महापुरुषांचा अपमान आहे, असा आरोप राष्ट्रवादीने केला तर स्वतःच्या सत्तेच्या काळात आघाडीला दोन्ही महापुरुषांचे पुतळे बसवता आले नाहीत. याचं दुःख आघाडीला आहे, म्हणूनच ते भाजपवर आरोप करत आहेत, असे भाजपचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *