सोन्याच्या दरात मोठी घसरण, प्रतितोळ्याचा भाव ५००० ने खाली

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- मुंबई ;सोनं आणि चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्याच्या दरात जवळपास पाच हजारांची घसरण झाली असून ४० हजारांच्या खाली पोहोचलं आहे. तर चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली . कोरोना व्हायरसचा परिणाम सराफा बाजारावरही पाहायला मिळत आहे.

कोरोनामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात रुपया कमकुवत झाल्याने सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. मागील दहा दिवसात सराफा बाजारात सोनं प्रतितोळा सुमारे पाच हजारांनी स्वस्त होऊन ४० हजारांच्या खाली पोहोचलं आहे. सोन्याच्या दरात १९४९ रुपयांनी घसरण होऊन प्रति दहा ग्रॅम ३९ हजार ६६१ रुपये झाला आहे. तर चांदीच्या दरात प्रतिकिलो ६४४५ रुपयांनी घसरला आहे. चांदी प्रतिकिलो ४० हजार ३०४ रुपये झाली आहे.

कोरोनामुळे सोनं आणि चांदी स्वस्त झाली आहे. गुढीपाडवा आणि लग्नसराईच्या तोंडावर सोन्याच्या दरात घसरण झाल्याने ग्राहकांसाठीही खुशखबर आहे. परंतु मागील काही दिवसांपासून सराफा बाजारात शुकशुकाट आहे. मात्र तरीही ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवल्याचंच चित्र आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *