आज पीएम किसान योजनेचा दहावा हप्ता मिळणार

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा आजपासून 1 जानेवारीला दहावा हप्ता मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी रात्री उशिरा ट्विट करत याची घोषणा केली.

पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात 1 जानेवारी 2022 रोजी दुपारी 12.30 वाजता एकूण 20 हजार कोटी रुपये जमा होणार आहेत. ‘नववर्ष 2022 चा पहिला दिवस देशाच्या अन्नदात्यांना समर्पित असेल,’ असे ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम-किसान योजनेचा दहावा हप्ता आज शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. 10 कोटींहून अधिक शेतकरी कुटुंबांना पीएम किसान योजनेचा फायदा होईल. अधिक माहितीसाठी pmkisan.gov.in किंवा हेल्पलाइन क्रमांक 155261 किंवा टोल फ्री 1800115526 वर कॉल करता येईल. याशिवाय 011-23381052 वर कॉल करूनही माहिती मिळेल. pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवरही तक्रार करता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *