आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते बांधकाम कामगारांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . १ जानेवारी । पिंपरी चिंचवड । अनेकदा समाजातील   वंचित घटकांना केंद्राच्या आणि राज्याच्या अनेक योजनांचा आपणाला लाभ मिळतो याची माहितीच नसते. त्यामुळे शासकीय योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा. यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून सातत्याने विविध कार्यक्रम राबविले जातात. प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचून त्यांना शासनाच्या अमक्या योजनांमधून तुम्हाला हा लाभ पोहोचू शकतो, याची त्यांना माहिती दिली जाते. परिणामी शहरातील शेकडो – हजारो नागरिकांना आमदार अण्णा बनसोडे यांच्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या अनेक योजनांचा लाभ मिळत आहे.

बांधकाम कामगार हा कायम स्थलांतरीत होत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी बांधकाम कामगार हा आयुष्यभर पाठीवर बिऱ्हाड घेऊन जगत असतो. आज या बांधकाम साइटवर, तर उद्या त्या बांधकाम साइटवर हा कामगार स्थलांतर करत असतो. हे करत असताना पोटासाठी लागणारे अन्न शिजवण्याची साधने सुद्धा त्याच्याकडे नसतात. ही बाब लक्षात घेऊन पिंपरी – चिंचवड परिसरातील कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी योजनेच्या अंतर्गत नोंदणी करून बांधकाम कामगार कार्ड वाटप करण्यात आली.

यावेळी आमदार बनसोडे यांच्या हस्ते नोंदित बांधकाम कामगारांना योजनेतून मिळणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचे ( पेटी) वाटप करण्यात आले. यात बॅटरी , हेल्मेट, चटई, जेवणाचा डबा,मच्छरदाणी, बॅग , पाण्याची बाटली ,बूट ,दोरी, हातमोजे , मास्क , जॅकेट हेडफोन , इत्यादी वस्तूंचा समावेश होता .एकूण १५० कामगारांना या योजनेचा लाभ झाला. यावेळी बांधकाम कामगार विक्रांत शिंदे , दत्तात्रय शिंदे , कल्पना धाकड, विदुला पिंजण , अश्विनी मोहिते , वीरेंद्र खिलावन , सुनीता खिलावण, संजीवनी कुलकर्णी , संगीता बुरुते , स्वाती मोरे, अर्चना शिरकर सुरेखा मोरे, सुजाता कदम व सामाजिक कार्यकर्त्या आशाताई शिंदे उपस्थित होत्या .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *