महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० जानेवारी । टीम इंडियाने जोहान्सबर्गमधील पराभव विसरत तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टसाठी (India vs South Africa 3rd Test) सराव सुरू केला आहे. केपटाऊनमध्ये 11 ते 15 जानेवारीच्या दरम्यान ही टेस्ट खेळली जाईल. तीन टेस्टची मालिका सध्या 1-1 ने बरोबरीत आहे. आता केपटाऊनमध्ये होणाऱ्या तिसऱ्या आणि निर्णायक टेस्टला निर्णायक महत्त्व प्राप्त झाले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) केपटाऊनमधील सरावाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
बीसीसीआयने शेअर केलेल्या फोटोमध्ये टेस्ट टीमचा कॅप्टन विराट कोहली (Virat Kohli) प्रॅक्टीस करताना दिसत आहे.कोहली दुखापतीमुळे दुसरी टेस्ट खेळू शकला नव्हता. तर फास्ट बॉलर मोहम्मद सिराज (Mohammad Siraj) या फोटोंमधून गायब आहे. सिराजला दुसऱ्या टेस्टच्या दरम्यान दुखापत झाली आहे. त्यामुळे त्याने त्या टेस्टमध्ये अधिक काळ बॉलिंग केली नव्हती. आता तो तिसऱ्या टेस्टमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
सिराजच्या जागी अनुभवी इशांत शर्माला (Ishant Sharma) संधी मिळू शकते. शर्माकडे 100 पेक्षा जास्त टेस्ट खेळण्याचा अनुभव आहे. त्याचबरोबर हनुमा विहारी (Hanuma Vihari) देखील प्रॅक्टीस सेशनमध्ये दिसत नाही. याचा अर्थ विराट मंगळवारपासून सुरू होणाऱ्या टेस्टमध्ये विहारीच्या जागी खेळणार आहे, असा होत आहे.
It's GO time here in Cape Town 👏 👏#TeamIndia all set and prepping for the series decider 👍 👍#SAvIND pic.twitter.com/RgPSPkNdk1
— BCCI (@BCCI) January 9, 2022
टीम इंडियाने सेंच्युरियन टेस्ट 113 रनने जिंकत या मालिकेची जोरदार सुरूवात केली होती. सेंच्युरियनमध्ये पहिल्यांदाच भारतीय टीमने टेस्ट मॅच जिंकण्याचा पराक्रम केला. त्यानंतर जोहान्सबर्ग टेस्टमध्ये भारतीय टीमला 7 विकेट्सने पराभव सहन करावा लागला. त्या मॅचमध्ये विराट पाठदुखीमुळे खेळू शकला नाही. त्याच्या जागी केएल राहुल (KL Rahul) टीम इंडियाचा कॅप्टन होता.
टीम इंडिया शनिवारी केपटाऊनमध्ये दाखल झाली आहे. या मैदानात भारतीय टीमला आजवर एकही टेस्ट मॅच जिंकता आलेली नाही. आता दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदा टेस्ट सीरिज जिंकण्यासाठी हा इतिहास बदलण्याचे आव्हान टीम इंडियामोर आहे.