महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१२ जानेवारी । नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणाऱ्या तीन प्रभागातील रस्त्यावर अतिक्रमण करून उभ्या असलेल्या 54 बेवारस वाहनांना (Vehicle) नोटिसा लावण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक वाहने खराडी परिसरातील आहेत.खराडी येथील जनक बाबा दर्गा ते फाउंटन रोड भागातील सोळा, खराडी आपले घर परिसरातील दोन, वडगाव शेरी मधील चौदा, विमाननगर मधील दहा, शास्त्रीनगर आणि कल्याणीनगर येथील सहा अशा बेवारस वाहनांवर अतिक्रमण विभागाच्या चार पथकांनी नोटिसा लावल्या.
वाहतुकीला अडथळा ठरणारी आणि परिसरातील सौंदर्याला बाधा पोहोचवणारे, अस्वच्छतेसाठी कारणीभूत ठरणारी, रस्त्यावरील बेवारस दुचाकी, तीन चाकी, आणि चार चाकी वाहने शोधण्याची मोठी मोहीम पुणे महानगरपालिकेने हाती घेतली आहे.
याविषयी नगर रस्ता क्षेत्रीय कार्यालयाचे अतिक्रमणही निरीक्षक अनिल परदेशी म्हणाले, नोटीस लावल्यानंतर सात दिवसांनी पंचनामा करून ही सर्व वाहने दोन क्रेनच्या मदतीने रस्त्यावरून हटवण्यात येणार आहेत. रस्त्यावर पडलेली वाहने त्यांच्या मालकांनी लवकरात लवकर हटवावीत.
रस्त्यावरील बेवारस वाहनानंपैकी अनेक वाहनांचे क्रमांक, काहींची इंजिनच गायब आहे. दिलेल्या नोटिशीला प्रतिसाद न आल्यास पंचनामा करून ही वाहने जप्त केली जाणार आहेत. शिवाय कारवाईचा खर्च वाहन मालकांकडून वसूल केला जाणार आहे.