महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । उत्तरेकडे आलेल्या थंडीच्या लाटेचा परिणाम राज्यात दिसून येत आहे. राज्यात अनेक ठिकाणी पारा चांगलाच घसरला आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत सध्या राज्यभरात थंडीची लाट पसरली आहे. साताऱ्यातील वेण्णा लेक परिसरात बुधवारी मध्यरात्री तापमान शून्य अंशांपर्यंत पोहोचले आहे. पुण्यात वाढत्या थंडीमुळे उबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. सातत्याने गारठा असल्यानं सकाळच्या वेळी रस्त्यावर शुकशुकाट बघायला मिळत आहे. तर नाशिकमध्येसुद्धा पारा 10 अंशावर गेला आहे. निफाडमध्ये या पेक्षा कमी असण्याची शक्यता आहे.गोदावरी नदीवरील धार्मिक कार्य ही उशिराने सुरू होत आहेत. तसेच चहाच्या ठेल्यावर लोक गर्दी करत असल्याचे दिसत आहे.