देशात कोरोना रुग्ण संख्या चिंताजनक :पंतप्रधानांची आज राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, कोविड-19 च्या स्थितीवर होणार चर्चा

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१३ जानेवारी । पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी संध्याकाळी 4:30 वाजता सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत कोविड-19 च्या स्थितीवर व्हिडिओ कॉन्फ्रेसिंगच्या माध्यमातून चर्चा करतील. यापूर्वी रविवारी पंतप्रधानांनी कोरोनाच्या स्थितीविषयी आपत्कालिन बैठक बोलावली होती. या बैठकीत, पंतप्रधानांनी जिल्हा स्तरावर आरोग्याच्या पुरेशा पायाभूत सुविधांची खात्री करण्याच्या गरजेवर भर दिला. मोदींनी राज्यांमधील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेण्यासही सांगितले होते.

सध्या देशामध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येत देखील वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही बैठक बोलावली आहे. आता या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. वाढत्या कोरोना रुग्णांमध्ये देशभरात पुन्हा लॉकडाउन लागणार का? हे देखील पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

देशात बुधवारचा दिवस कोरोना व्हायरसच्या हिशोबाने खूप भयावह राहिला. बुधवारी 2 लाख 45 हजार 525 नवीन कोरोना संक्रमित आढळले. 84,479 लोक बरे झाले तर 379 लोकांचा मृत्यू झाला. अशा प्रकारे अॅक्टिव्ह केस म्हणजेच उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 1 लाख 61 हजार 721 ची वाढ नोंदवण्यात आली आहे. सध्या देशात 11.11 लाख अॅक्टिव्ह केस आहेत. तिसऱ्या लाटेत अॅक्टिव्ह केस पहिल्यांदा 11 लाखांच्या पार गेल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *