Corona, Omicron Cases Maharashtra LIVE : शाळा सुरु करण्याबाबत पालकांमध्ये दोन मतप्रवाह : राजेश टोपे

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १६ जानेवारी । महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या मागील काही दिवसांपासून 40 हजाराच्या पुढेच आहे. आजही राज्यात 42 हजार 462 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 23 कोरोना रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona Death) झाला आहे. दिवसभरात 39 हजार 646 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. . तर राज्यातील ओमिक्रॉनबाधितांचा दिवसभरातील आकडा 125 इतका आहे.

शाळा सुरु करण्याबाबत दोन मतप्रवाह
# कॅबिनेट मध्ये चर्चा झाली.
# पालकांमध्येही दोन मतप्रवाह.
# शाळा बंद ठेवा असही काही पालक म्हणतात, काही पालक शाळा सुरु करा म्हणतात.
# 15 दिवसानंतर शाळा सुरु करण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय घेऊ.
# कोरोना लस घेतल्यास दवाखान्यात जावं लागणार नाही
# कोरोना लसीकरण ऐच्छिक असल्यानं गती मंदावली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *