महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२० जानेवारी । पाचव्या आणि सहाव्या मार्गाच्या कामासाठी ठाणे-दिवा डाऊन जलद मार्गावर १४ तासांचा पायाभूत सुविधांच्या कामासाठी ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी (ता. २३) या मार्गावरुन धावणाऱ्या पुणे-मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई डेक्कन एक्स्प्रेस (Pune Mumbai Deccan Express) या रेल्वे गाड्यांसह इतर रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. शनिवारी मध्यरात्री दीड वाजल्यापासून रविवारी ३.२० वाजेपर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस रविवारी पहाटे दोन वाजल्यापासून ते ब्लॉक अवधी पूर्ण होईपर्यंत कल्याणकडे जाणाऱ्या उपनगरीय व मेल एक्स्प्रेस गाड्या मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या पायाभूत सुविधांच्या ब्लॉकमुळे होणाऱ्या गैरसोयीबद्दल प्रवाशांनी सहकार्य करावे, अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.