![]()
महाराष्ट्र 24 | विशेष प्रतिनिधी | दि. २१ फेब्रुवारी २०२६ ||
मेष राशिभविष्य (Aries Horoscope)
घरातील वातावरण प्रसन्न असेल. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाकडे आकर्षित होतील. दिवस मजेत जाईल. तरुण वर्गाला नवीन संधी मिळेल. घरात टापटीप ठेवाल.
वृषभ राशिभविष्य (Taurus Horoscope)
जवळचा प्रवास मजेत पार पडेल. मनातील चुकीचे विचार बाजूला सारावेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. मोठ्या लोकांच्यात वावराल. आवडत्या कामासाठी वेळ मिळेल.
मिथुन राशिभविष्य (Gemini Horoscope)
आवडीचे पदार्थ खायला मिळतील. कौटुंबिक सौख्य वाढीस लागेल. घरातील कामात मन रमेल. मौल्यवान वस्तु खरेदी केल्या जातील. जोडीदाराचे वर्चस्व राहील.
कर्क राशिभविष्य (Cancer Horoscope)
मनमोकळे वागाल. आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवाल. जोडीदाराची बाजू समजून घ्यावी. स्वच्छंदीपणे वागण्यावर भर द्याल. सर्वांशी मिळून-मिसळून वागाल.
सिंह राशिभविष्य (Leo Horoscope)
मानसिक चंचलता जाणवेल. भावनेच्या भरात वाहून जाऊ नका. नामस्मरण करण्यात वेळ व्यतीत करावा. अंगीभूत कलेचे योग्य कौतुक केले जाईल. जोडीदाराच्या शांत स्वभावाची प्रचिती येईल.
कन्या राशिभविष्य (Virgo Horoscope)
उत्तम व्यावसायिक लाभ संभवतो. मुलांच्या आनंदाने खुश व्हाल. उत्तम वाहन सौख्य लाभेल. स्थावरची कामे मार्गी लागतील. आरोग्यात सुधारणा होईल.
तूळ राशिभविष्य (Libra Horoscope)
प्रतिकूलतेतून मार्ग काढावा. भावंडांचा विरोध होऊ शकतो. काही गोष्टींपासून जाणीवपूर्वक दूर राहावे. प्रलोभनाला बळी पडू नका. भागिदारीतून चांगली कमाई करता येईल.
वृश्चिक राशिभविष्य (Scorpio Horoscope)
घशाचे विकार जाणवू शकतात. वस्तूंची उपयुक्तता लक्षात घेऊन खरेदी करावी. काही कामात अधिक श्रम घ्यावे लागतील. कामात उतावीळपणा करून चालणार नाही. गोड बोलण्यावर भर द्यावा.
धनू राशिभविष्य (Sagittarius Horoscope)
स्वभावात काहीसा हेकटपणा येईल. स्वातंत्रप्रियता दर्शवाल. पारंपरिक कामात लक्ष घालावे लागेल. हातात नवीन अधिकार येतील. भावंडांचा सहवास लाभेल.
मकर राशिभविष्य (Capricorn Horoscope)
चिकाटीने कामे कराल. जबाबदारीने वागणे ठेवाल. घराची साफसफाई काढाल. जोडीदाराचा प्रेमळ सहवास लाभेल. कमिशन मधून चांगली कमाई होईल.
कुंभ राशिभविष्य (Aquarius Horoscope)
स्थावरच्या कामात यश येईल. हाताखालील लोकांचे उत्तम सहकार्य मिळेल. कामात समाधानी राहाल. जवळचे नातेवाईक भेटतील. परिस्थितीशी जुळवून घ्याल.
मीन राशिभविष्य (Pisces Horoscope)
झोपेची तक्रार कमी होईल. सर्वांना प्रेमाने आपलेसे कराल. छंद जोपासायला वेळ काढाल. अपवाद नजरेआड करावेत.