नाशिक : निफाडला निचांकी तापमानाची नोंद; पारा ५.५ अंशावर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२४ जानेवारी । निफाड तालुक्यात चालु हंगामातील निचांकी तपमानाची नोंद झाली आहे. आज (सोमवार) सकाळी कृषी संशोधन केंद्र कुंदेवाडी येथे पारा ५.५ अंशापर्यंत घसरल्याची नोंद करण्यात आली.

रविवार दिवसभर गार हवा तसेच धुकेसदृश्य वातावरणाने नागरिक चांगलेच गारठलेले होते. त्यातच आज (सोमवार) पारा चालु हंगामातील निचांकी पातळीवर आला आहे. द्राक्ष बागायतदारांना या हंगामात पारा घसरल्याने प्रतवारीवर परिणाम होण्याचा धोका आहे. पहाटेपासुन द्राक्षबागेला पाणी देणे शेकोटी पेटविणे हे नित्याचे उपाय सुरु आहेत.

पारा घसरल्याने द्राक्षमण्यांची फुगवण थांबणार आहे. पिकलेल्या द्राक्षमण्यांना तडे जाऊन नुकसान होण्याचा धोका आहे. रब्बी हंगामातील गहु, हरभरा, कांदा पीकाला घसरलेला पारा पोषक आहे. थंडीमुळे जिल्ह्यात सुरु होत असलेल्या शाळांत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना ऊबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. ठिकठिकाणी वाडी वस्त्यांवर शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे. निफाडला पारा थेट ५.५ अंशावर आल्याची ही चालु हंगामातील निचांकी पातळी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *