एअरटेलसोबत मिळून स्वस्त स्मार्टफोनची निर्मिती करणार गुगल

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । स्वस्त स्मार्टफोन आणि ५ जी सेवा देण्यासाठी गुगल आणि भारती एअरटेलने हातमिळवणी केली आहे. रेग्युलेटरी फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारतीय दूरसंचार कंपनी भारती एअरटेलमध्ये गुगल १०० कोटी डॉलर्सची (रु.७,५१० कोटी) गुंतवणूक करणार आहे. गुगल यात भारती एअरटेलमध्ये ७० कोटी डॉलर्सची (५२५७ कोटी रुपये) गुंतवणूक करून समभाग खरेदी करेल. तसेच एकत्रितपणे स्वस्त फोन विकसित करेल आणि ५ जीसाठी संशोधन करेल. फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, भारती एअरटेलमधील १.२८ टक्के समभाग ७३४ रुपये प्रति शेअर या दराने गुगल खरेदी करेल. याशिवाय, उर्वरित ३०० कोटी डॉलर्स (रु. २२५३ हजार कोटी) अनेक वर्षांसाठी व्यावसायिक कराराच्या स्वरूपात गुंतवले जातील.

एअरटेलने जारी केलेल्या माहितीनुसार, गुगलसोबत भागीदारी अंतर्गत सर्व किंमतींमध्ये स्मार्टफोन उपलब्ध करून दिला जाईल. याशिवाय, भारताच्या स्थानिक परिस्थितीनुसार 5G नेटवर्कवर दोन्ही कंपन्या एकत्र काम करतील. दोन्ही कंपन्या एकत्रितपणे देशातील व्यवसायासाठी क्लाउड इकोसिस्टमला प्रोत्साहन देतील.

गुंतवणूकदारांनी गुगल आणि एअरटेल यांच्यातील भागीदारीचे स्वागत केले आहे. इंट्रा-डे मध्ये एनएसईवर आज त्याच्या किमती रु. ७०६.९५ वरून ७२१.९५ वर पोहोचल्या आहेत. यावर्षी आतापर्यंत त्याच्या किमतीत ४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला त्याचा एक शेअर ६९१.३० रुपये होता. एका वर्षाच्या कालावधीत २८ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *