सोने-चांदी आणखी स्वस्त ; जाणून घ्या आजचा सराफा बाजाराचा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .२८ जानेवारी । आज शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात सोने आणि चांदीमध्ये नफावसुली दिसून आली. आज सोने ३८० रुपयांनी तर चांदी ७५० रुपयांनी स्वस्त झाली.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७५८० रुपये इतका खाली आला आहे. त्यात ३६० रुपयांची घसरण झाली. तत्पूर्वी सोनं ४७५५६ रुपयापर्यंत खाली आला होता. एक किलो चांदीचा भाव ६१३३९ रुपये आहे. त्यात ६०५ रुपयांची घसरण झाली आहे. चांदीने आज इंट्रा डेमध्ये ६१२९९ रुपयांचा नीचांकी स्तर गाठला होता.

कालच्या सत्रात गुरुवारी सोने दरात ६१३ रुपयांची घसरण झाली होती. चांदीचा भाव ८३४ रुपयांनी कमी झाला होता. बुधवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त कमॉडिटी बाजार बंद होता. मंगळवारी सोने २४४ रुपयांनी महागले होते. सोन्याचा भाव ४८६९७ रुपये इतका वाढला होता.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज शुक्रवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१५० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९२५० रुपये इतका आहे. त्यात ३९० रुपयांची घसरण झाली. आज दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१५० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४९३०० रुपये आहे. त्यात ३५० रुपयांची घसरण झाली आहे. आज चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५४९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९६३० रुपये इतका आहे. त्यात २७० रुपयांची घसरण झाली. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५१५० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९२५० रुपये इतका आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *