सोन्यातील तेजी कायम; चांदीला बसला फटका, जाणून घ्या नवे दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि . ८ फेब्रुवारी । महागाई वाढ आणि रिझर्व्ह बँकेचे पतधोरण याचे पडसाद आज कमॉडिटी बाजारात उमटले. आज सोन्यातील तेजी कायम असून चांदीला मात्र नफावसुलीचा फटका बसला आहे. आज सोने ७० रुपयांनी महागले. कालच्या सत्रात सोने ३११ रुपयांनी वाढले होते.

मल्टी कमॉडिटी एक्सचेंजवर सध्या १० ग्रॅम सोन्याचा भाव ४८११९ रुपये इतका आहे. ४८३०० रुपये इतका आहे. त्यात ७० रुपयांची वाढ झाली. काल सोमवारी सोने दरात ३११ रुपयांची वाढ झाली होती. सोन्याचा भाव ४८२३५ रुपयांपर्यंत वाढला होता. आज एक किलो चांदीचा भाव ६१७८८ रुपये इतका आहे. त्यात २४७ रुपयांची घसरण झाली आहे.

गेल्या आठवड्यात सोने ५०० रुपयांनी महागले होते. चांदीमध्ये जवळपास ६५० रुपयांची वाढ झाली होती. शुक्रवारी बाजार बंद होताना १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७९४८ रुपये इतका होता. त्यात ३१ रुपयांची वाढ झाली.

Goodreturns या वेबसाईटनुसार आज मंगळवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४०० रुपये इतका आहे. २४ कॅरेटचा भाव ४९२६० रुपये इतका आहे. त्यात २०० रुपयांची वाढ झाली आहे. दिल्लीत सराफा बाजारात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४०० रुपये इतका आहे. दिल्लीत २४ कॅरेटचा सोन्याचा भाव ४९५३० रुपये आहे. त्यात २३० रुपयांची वाढ झाली आहे.

चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४५५९० रुपये तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९७४० रुपये इतका आहे. कोलकात्यात आज २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५४०० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९५३० रुपये इतका आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात आज सोन्याचा भाव १८२१.२६ डॉलर प्रती औंस इतका वाढला आहे. चांदीचा भाव २३.०१ डॉलर प्रती औंस झाला. त्यात ०.१ टक्के वाढ झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *