महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१० फेब्रुवारी । शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणात भाजप आमदार नितेश राणे यांना बुधवारी न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला. दरम्यान, आज रुग्णालयातून सिंधुदुर्गात आल्यानंतर नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि यावेळी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
मी न्यायालयीन कोठडीत असताना माझ्या प्रकृतीबाबत ज्यांनी आरोप केले ते पाहून मला आश्चर्य वाटले. मला शुगर आणि पाठिच्या मणक्याचा त्रास यापूर्वीही होता. मी न्यायालयीन कोठडीत असतानाही माझी तपासणी झाली तेव्हाही त्याबातब रिपोर्ट आले. तरीही काही लोकांनी हा राजकीय अजार असल्याची टीका माझ्या आजारावर केली. कोणाच्याही आजारपणावरुन टीका करणे हे योग्य नसल्याचे मत नितेश राणे यांनी यावेळी व्यक्त केले.
आजारपणावर केलेल्या टीकेमुळे नाराज झालेल्या नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर यावेळी जोरदार टीका केली. जेव्हा सरकार पडण्याची, आरोपांना उत्तरे द्यायची वेळ येथे तेव्हा मुख्यमंत्री गळ्यात बेल्ट का घालतात? लता दिदींच्या अंतीम दर्शनाला मुख्यमंत्री स्वत: जातात. मात्र, विधिमंडळ अधिवेशन सुरु असते तेव्हा मुख्यमंत्री आजारी कसे पडतात? महाविकासआघाडी सरकारमधील मंत्र्यांना ईडीची चौकशी लागते तेव्हाच त्यांना कोरोना का होतो, असे प्रश्न आम्ही विचारायचे का? असे म्हणत नीतेश राणे यांनी महाविकासआघाडी सरकारवर टीका केली. दरम्यान, राणेंनी मुख्यमंत्र्यांवर अनेक प्रश्न उपस्थित केले संपूर्ण न्यायालयीन प्रक्रिया संपल्यानंतर, आजारातून बाहेर आल्यानंतर मी जेव्हा बोलेन तेव्हा अनेकांची बीपी वाढायला सुरुवात होईल.
आमदार नितेश राणे म्हणाले, पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत मी पहिल्या दिवसापासूनच पोलिसांना, संबंधित अधिकाऱ्यांना जी-जी माहिती हवी होती, तपासकार्यात मी सातत्याने मदत करत होतो. तशीच मदत पुढेही पोलिसांना तपासकार्यात जी मदत लागेल.