महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ११ फेब्रुवारी । 7th Pay Commission : तुम्हीही DA वाढण्याची (DA Hike) वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पूर्ण ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यासोबतच 18 महिन्यांपासून रखडलेल्या डीएबाबतही केंद्र सरकार निर्णय घेऊ शकतं.
दरम्यान, राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. हिमाचल प्रदेश सरकारमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या वाढीव डीएचा लाभ मिळणार आहे.
हिमाचल प्रदेश सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 3 टक्क्यांनी वाढ केली आहे. आतापासून कर्मचाऱ्यांना 31 टक्के दराने डीए मिळेल.
2.25 लाख कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्यासाठी राज्य सरकारनं नुकताच सुमारे 6000 कोटी रुपयांचा निधी जारी केला आहे.
मुख्यमंत्र्यांनी कर्मचाऱ्यांना 3 टक्के अतिरिक्त महागाई भत्ता देण्याची घोषणा केली आहे. यापुढे राज्यातील कर्मचाऱ्यांना 31 टक्के महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. यासाठी सरकारी तिजोरीतून 500 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
यापूर्वी कर्मचाऱ्यांना 28 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता. याशिवाय कल्याणकारी योजना आणि पेन्शनचा लाभ घेण्यासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादाही 35000 रुपयांवरून 50000 रुपये करण्यात आली आहे.
याशिवाय केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर AICPI निर्देशांकानुसार या कर्मचाऱ्यांना सप्टेंबर 2021 पर्यंत 33 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. त्यानुसार त्यांच्या महागाई भत्त्यात सुमारे 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
डिसेंबर 2021 पर्यंत, सीपीआयचा आकडा 125 पर्यंत राहिला तर महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढू शकतो. केंद्र सरकारने महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवल्यास कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 31 टक्क्यांवरून 34 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. त्याचे पेमेंट जानेवारी 2022 पासून केले जाईल.