महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ११ फेब्रुवारी । शहरातील भाजीपाल्याची महत्त्वाची व बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डत (market yard ) कोकणातील (kokan ) हापूस आंब्याच्या पाच पेट्या दाखल झाल्या आहेत. या सिझनमधील पाचवी आवाक आहे. या पाच डझन आंब्याच्या(mango box) एक पेटीला तब्बल 31 हजार रुपये याप्रमाणे पाच पेटयांना इतका विक्रमी भाव मिळाला आहे. पुण्यातील मार्केट यार्डात जानेवारीत पहिल्यांदा आंबा येतो. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याच्यात थोडी वाढ होते, अन मार्च महिन्यात आंब्याचा खरा सिझन सुरु होतो. मार्केट यार्डातून दरवर्षी – कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. आजच्या हापूस आंब्याला मिळलेलीही सर्वात विक्रीमी बोली होते. मागील पन्नास वर्षतील सर्वात विक्रमी बोली असल्याचे माहिती मार्केट यार्डातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली आहे. तब्बल 1 लाख 24 हजार रुपयांच्या चार पेट्यांची विक्री झाली आहे. या हापूस व्यापाऱ्यांनी हार श्रीफळ फोडून या पेट्यांची पूजा करण्यात आली.
कोरोनाची भीती नाही मागील दोन वर्षांत कोरोनाचा सर्वात मोठा फटका सर्वचा क्षेत्रांना बसला.या काळात आंब्याच्या सिझनचेही मोठे नुकसान झाले. याचा व्यापाऱ्यांना व शेतकऱ्यांना मोठा फाटक बसला. मात्र यावेळी नागरिकांच्यामध्ये भीतीचे वातावरण नाही. अनेक लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे . त्यामुळे खरेदीसाठी तसेच विक्रीसाठीही बाहेर पडत आहेत. त्यामुळे यंदा आंब्याच्या सिझन निश्चितच दिलासादायक असणार आहे.
या ठिकाणाहून होते आवक शहरातील मार्केट यार्डामध्ये महारष्ट्रातील, रत्नागिरी, देवगड, कुणकेश्वर, तर दक्षिण भारतातून मद्रास , बंगलोर आदी भागातून सर्वाधिक आवाक होताना दिसून येत आहे. यामध्ये सर्वाधिक विक्री हे रत्नागिरी देवदेवगड या आंब्यांची होते. फळांच्या मार्केटयामध्ये आंब्याच्या सिझनला बाजरापेठ सर्वाधिक आर्थिक उलाढाल होते. आर्थिक फायदाही मोठ्या प्रमाणात मिळतो
रत्नागिरी जिल्ह्यातील रीळ या गावातून शेतकरी मकरंद काने यांच्या बागेतून मे. गणेश फ्रुट एजन्सी, अरविंद मोरे यांच्या गाळ्यावर पाच पेट्या शुक्रवारी आल्या होत्या. लिलावात व्यापारी युवराज काची यांनी तब्बल 31 हजार रुपयांना एक पेटी याप्रमाणे खरेदी केल्या. बाजार आवारातील ज्येष्ठ असते एकनाथ यादव, अडते असोसिएशनचे संचालक गणेश यादव, रावसाहेब कुंजीर, सुनील वंजारी, जगणाथ वंजारी, विनोद परदेशी, सुधीर मनुसुख, माणिक ओसवाल, हमजू भोले, अब्दुल चौधरी, निलेश शिंदे यांच्यासह बाजारातील अडते उपस्थित होते.