IND vs WI: आजपासून टी-२० मालिका; यामुळे वेस्ट इंडिजचा विजय अशक्य, अशी असेल भारताची प्लेइंग इलेव्हन

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि .१६ फेब्रुवारी । वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत ३-० असा शानदार विजय मिळवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ आज बुधवारपासून ३ सामन्यांची टी-२० मालिका खेळणार आहे. कोलकाताच्या ईडन गार्ड्न्स मैदानावर होणाऱ्या या लढतीसाठी रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ फेव्हरेट मानला जात आहे.

उपकर्णधार केएल राहुल दुखापतीमुळे या मालिकेतून बाहेर झालाय. त्यामुळे आता पहिल्या लढतीत कर्णधार रोहित शर्मा सोबत सलामीला ईशान किशन येण्याची शक्यता आहे. २०१७ पासून भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने एकही टी-२० मालिका गमावली नाही. वेस्ट इंडिजने २०१७ साली भारताला टी-२० मालिकेत पराभूत केले होते. या घटनेला आता पाच वर्ष झाली आहेत.

टी-२० मालिकेआधी आयपीएल २०२२चा लिलाव झाला. लिलावात भारतीय संघात असलेल्या १० खेळाडूंनी मोठी बोली लावण्यात आली. यात ईशान किशन, श्रेयस अय्यर, हर्षल पटेल, शार्दूल ठाकूर यांचा आहे. आता हे टीम इंडियाकडून कशी कामगिरी करतात याची उत्सुकता असेल.

विराटच्या फॉर्मची काळजी

भारताचा माजी कर्णधार विराट कोहली याला वनडे मालिकेत फार चांगली कामगिरी करता आली नव्हती. आता टी-२० मालिकेत त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा असेल. विराटकडून सर्वांना शतकाची प्रतिक्षा आहे. त्याच बरोबर श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव यांच्याकडून देखील मोठ्या खेळीची आशा असेल. गोलंदाजीत युजवेंद्र चहलवर सर्व काही अवलंबून असले. वनडे मालिकेत त्यांनी चांगली कामगिरी केली होती. दुखापतीमुळे वॉशिंग्टन सुंदर मालिकेतून बाहेर पडल्याने रवी बिश्नोईला पदार्पणाची संधी मिळू शकते.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन

रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव किंवा श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, वेंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दूल ठाकूर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, युजवेंद्र चहल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *