महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि १८ फेब्रुवारी । दुसऱ्याच्या नावाच्या बनावट आधारकार्डच्या आधारे दोघांनी आठ सीमकार्ड घेतले. मग त्या सीमकार्डवरून आंतरराष्ट्रीय कॉल करून एअरटेल कंपनीची पाच लाख 24 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा झोल कळताच कंपनीने अंबोली पोलिसांत तक्रार दिली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करून उपनिरीक्षक वैभव गुरव तसेच विलास दुलम, प्रकाश नागे, संदीप सावंत आदींच्या पथकाने या प्रकरणात एका तरुणाला अटक असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.