महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । श्रीलंकेविरुद्धच्या आगामी टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी काल संघ जाहीर करण्यात आला. BCCI च्या निवड समितीने संघात अनेक मोठे बदल केले आहेत. अजिंक्य रहाण, चेतेश्वर पुजारा, ऋद्धिमान साहा (Wriddhiman Saha) आणि इशांत शर्मा सारख्या वरिष्ठ खेळाडूंना संघातून डच्चू दिला आहे. श्रीलंका सीरीजसाठी काल संघनिवड जाहीर झाल्यानंतर ऋद्धिमान साहाने खळबळजनक गौप्यस्फोट केला आहे. त्याला सुद्धा संघातून वगळण्यात आलं आहे. “इथून पुढे संघनिवडीसाठी तुझा विचार होणार नाही. त्यामुळे तू आता निवृत्तीचा विचार कर” असं हेड कोच राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापनाने आपल्याला सांगितलं, असा दावा ऋद्धिमान साहाने केला आहे. भारतीय संघात आता निवड होणार नाही, म्हणून ऋद्धिमान साहाने रणजी करंडक स्पर्धेतून माघार घेतली, असं वृत्त आठ फेब्रुवारीला पीटीआय वृत्तसंस्थेनं दिलं होतं.
“यापुढे माझाा विचार होणार नाही, याची संघ व्यवस्थापनाने मला कल्पना दिली होती. मी भारतीय संघाचा भाग होतो, म्हणून इतके दिवस मी गप्प होतो” असं ऋद्धिमान साहाने शनिवारी सांगितलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. “मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी सुद्धा मला निवृत्तीचा विचार करण्याचा सल्ला दिला होता” असं साहा म्हणाला.
संघातून कोण बाहेर गेलं?
चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, इशांत शर्मा, ऋद्धिमान साहा संघातून बाहेर
फिटनेसमुळे केएल राहुल आणि वॉशिंग्टन सुंदर दोघांचा श्रीलंकेविरुद्ध टी-20 आणि कसोटी मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरला श्रीलंकेविरुद्धच्या सीरीजसाठी आराम देण्यात आला आहे. शार्दुल टेस्ट आणि टी-20 दोन्ही संघांमध्ये नसणार आहे.
संघात कोणाचा समावेश?
श्रीलंकेविरुद्धच्या टी 20 सीरीजसाठी जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजा समावेश करण्यात आला आहे. जसप्रीत बुमराह विश्रांती घेऊन संघात परतला आहे, तर जाडेजाने त्याच्या दुखापतीवर मात केली आहे.
कुलदीप यादवने एकवर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन केलं आहे. यापूर्वी जानेवारी 2021 मध्ये कुलदीप भारताच्या कसोटी संघाचा भाग होता.
संजू सॅमसन पुन्हा एकदा भारतीय संघात परतला आहे. त्याला टी 20 संघात स्थान मिळाले आहे. तो 2019 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारतीय संघाचा हिस्सा होता. नवीन चेहरा
सौरभ कुमारच्या रुपात भारतीय संघात नवीन चेहरा आला आहे. हा उत्तर प्रदेशचा खेळाडू आहे. तो डावखुरा फिरकी गोलंदाज आहे.