विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : यापुढे परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २० फेब्रुवारी । Pune University on online exam copy : आता यापुढे कोणी परीक्षेत कॉपी करताना आढळला तर त्याची खैर नाही. थेट जेलची हवा खावी लागणार आहे. ऑनलाईन सत्र परीक्षेत कॉपी केल्यास फौजदारी गुन्हा दाखल केला जाईल. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने कॉपी बहाद्दरांना हा इशारा दिला आहे. कॉपी केल्यास आयटी अ‍ॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल होणार आहे.

ऑनलाईन परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा वापर करू नका, असे आवाहन पुणे विद्यापीठाने केले आहे. गेल्या दोन वर्षात ऑनलाईन परीक्षा देताना अनेक विद्यार्थी गैरप्रकार करताना आढळले. यावर्षी विद्यापीठाने कठोर नियम तयार केले आहे.

आयटी कायदा 2016 मधील काही कलम ऑनलाईन परीक्षेतील गैरप्रकारांना तंतोतंत लागू होतात. यात दोषी सापडणाऱ्यांवर दखलपात्र गुन्हा दाखल होईल. त्यानंतर दंडात्मक कारवाई होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नियमांचे पालन करून प्रामाणिकपणे पेपर सोडवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *