पालिकेचे 9 अधिकारी राणेंच्या बंगल्यात; घडामोडींना वेग

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २१ फेब्रुवारी । नारायण राणे यांच्या जुहूमधील अधीश बंगल्यावर अनधिकृतपणे बांधकाम केल्याचा ठपका ठेवत मुंबई महानगरपालिकेने नारायण राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर नारायण राणेंनी आपण कोणत्याच नियमांचं उल्लंघन केलं नसल्याचं सांगितलं. त्यानंतर आता आज या प्रकरणात मनपाने पुढील कारवाईस सुरूवात केली असून, कारवाईसाठी मुंबई महानगरपालिकेंचं पथक जुहूकडे रवाना झालं आहे. (BMC Action on Narayan Rane Adhish Bunglow, Juhu)

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे स्वत: देखील या बंगल्यात उपस्थित असल्याने तणाव निर्माण होण्याची शक्यता.नारायण राणेंच्या घराबाहेर मनपाचं पथक दाखल झालं असून, पोलिसांचा मोठा बंदोबस्त त्याठिकाणी आहे.मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी सांताक्रूझ पोलीस ठाण्यात पोहोचले असून, याठिकाणी कागदपत्रांची पुर्तता करून, पोलीस संरक्षण घेऊन ते पुढील कारवाईसाठी रवाना होणार आहे.बंगल्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीसांचा फौजफाटा
मनपाचं पथक काही वेळात अधीश बंगल्यावर पोहोचणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *