महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २२ फेब्रुवारी । घरगुती वापराच्या गॅसच्या किमती येत्या काळात वाढणार असल्याची शक्यता आहे. ही वाढ थोडीथोडकी नसून दुप्पट होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचसोबत विजेच्या किमतीतही वाढ होईल अशी शक्यता आहे.
जगभरात इंधन गॅसचा तुटवडा होत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. या परिस्थितीचे पडसाद एप्रिलपासून दिसून लागतील. सीएनजी, पीएनजी आणि विजेच्या दरांवर या तुटवड्याचा परिणाम होऊन त्यांच्या किमती भरमसाठ वाढतील असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.
सर्वसाधारणपणे दर वर्षी एप्रिल आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये नैसर्गिक इंधन गॅसच्या किमती निश्चित केल्या जातात. एप्रिल महिन्यात जारी केल्या जाणाऱ्या किमती या जानेवारी ते डिसेंबर 2021 च्या आंतरराष्ट्रीय किमतींवर आधारित असतात. काही तज्ज्ञांच्या मतानुसार, सीएनजी गॅसची किंमत प्रतिकिलो 15 रुपये इतकी वाढू शकते.