HSC Exams Rescheduled 2022 : 12 वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकात बदल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २४ फेब्रुवारी । बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आताची मोठी बातमी आहे. परीक्षा तोंडावर असताना बारावी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भाषा विषयाच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

5 आणि 7 मार्चला भाषा विषयाचे पेपर होणार होते, पण ही परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन वेळापत्रकानुसार 5 आणि 7 एप्रिलला आता या विषयांचे पेपर घेतले जाणार आहेत. 5 मार्चला प्रामुख्याने हिंदी, जर्मन, जपानी, चीनी आणि पर्शियन या भाषा विषयांचे पेपर होणार होते, ते पेपर आता 5 एप्रिलला होणार आहेत.

तर 7 मार्चला मराठी, गुजराती, कन्नड, हिंदी, मल्याळम, तेलगु, पंजाबी, उर्दु, फ्रेंच अशा विषयांचे पेपर होणार होते, पण हे पेपर आता 7 एप्रिलला होणार आहे.
काही अपरिहार्य कारणास्तव पेपर पुढे ढकलण्यात आल्याची बोर्डाने माहिती दिली आहे. येत्या चार मार्चपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *