महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाची झळ आता तुमच्या स्वयंपाक घराला बसणार आहे… कारण सर्व प्रकारच्या खाद्य तेलांच्या किंमतीत मोठी वाढ झालेली पाहायला मिळतेय.. सोयाबीन तेल, पामतेल, सू्र्यफूल तेल आणि शेंगदाणा तेलाच्या किंमतीत प्रतिकिलो ५ ते १० रुपयांची वाढ झालीय.. दरम्यान या दरवाढीमागे युद्धाचं कारण पुढे करत व्यापारी संधी साधत असल्याचा आरोप होतोय.. तर काही ठिकाणी तेलाची साठेबाजी सुरु असल्याचंही बोललं जातंय.