महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २६ फेब्रुवारी । आलिया भटचा (Alia Bhatt) बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. जाणून घेऊयात या चित्रपटाचं पहिल्या दिवशीचं बॉक्स ऑफिस कलेक्शन…
बॉक्स ऑफिस इंडियाच्या रिपोर्टनुसार, गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचं पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन 9.50-10 कोटी रूपये आहे. रिपोर्टनुसार, डिसेंबरमध्ये रिलीज झालेल्या रणवीर सिंहच्या 83 या चित्रपटापेक्षा गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विकेंडला या चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन चांगले होईल, असं म्हटलं जात आहे.
गंगूबाई काठियावाडी चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. आलियासोबत शांतनु महेश्वरी आणि अजय देवगण यांनी या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारली आहे. या चित्रपटातील ढोलिडा,झूमे रे गोरी, मेरी जान आणि जब सैय्या या गाण्यांना प्रेक्षकांची पसंती मिळाली.