Yashwant Jadhav : सलग चौथ्या दिवशी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरुच;

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । शिवसेनेचे मुंबई महापालिकेतील स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याची कारवाई सुरु आहे. गेल्या चार दिवसापासून यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरू आहे. दरम्यान, या चार दिवसांच्या चौकशीत अधिकाऱ्यांच्या हाती नेमकं काय लागले ते अद्याप गुलदस्त्यात आहे. या छापेमारीच्या या पार्श्वभूमीवर यशवंत जाधव यांच्या घराबाहेर पोलिसंचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दरम्यान, यावर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट केले आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी केलेल्या घोटाळ्यासंदर्भात आम्ही 18 ऑगस्ट 2021 रोजी आयकर विभाग आणि ईडी (ED)कडे तक्रार दाखल केली होती, असे सोमय्या यांनी म्हटले आहे.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी यशवंत जाधव यांच्या घरी आयकर खात्याच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर आज सलग चौथ्या दिवशीही आयकर अधिकाऱ्यांचा मुक्काम तिथेच आहे. मुंबई महापालिकेत स्थायी समितीचे अध्यक्ष असलेल्या यशवंत जाधव यांच्या माझगावातील घरी ही कारवाई सुरू आहे. याशिवाय त्यांच्या निकटवर्तीयाच्या घरीही आयकर विभागाने छापा टाकला आहे. मुंबई महापालिकेच्या काही कंत्राटदारांवरही आयकर खात्यानं छापा टाकून कारवाई केली आहे.

जानेवारी महिन्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. मुंबईतील कोविड सेंटर उभारणीत मोठा घोटाळा केल्याचा आरोप केला होता. तसेच यामध्ये मनी लॉन्ड्रिंग केल्याचाही गंभीर आरोपही सोमय्यांनी जाधवांवर केला होता. एवढंच नाहीतर आयकर विभागाच्या हाती पुरावे लागले आहेत. जाधव यांचं पितळ उघडं करण्यासाठी आयकर विभागाला पाठपुराव्यास मदत करणार असल्याचंही किरीट सोमय्या म्हणाले होते. त्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप झाल्याचे पाहायला मिळाले होते.

दरम्यान, आगामी महापालिका निवडणुकांच्या निवडणुकांच्या तोंडावर शिवसेना नेते यशवंत जाधवांच्या घरी आयकर विभागानं छापा टाकला आहे. यशवंत जाधव यांच्या माझगाव येथील घरी आयकर विभागानं छापा घातला आहे. त्यामुळे या छापेमारीमध्ये यशवंत जाधव यांच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती काय लागते हे पाहणे महत्त्वाचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *