महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २८ फेब्रुवारी । केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदिपसिंह पुरी २ मार्चला औरंगाबाद दौऱ्यावर असून, त्यांच्या हस्ते घरगुती गॅस पाइपलाईनचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या योजनेचा एकूण खर्च ४ हजार कोटी रुपये आहे. पहिल्या टप्प्यात २ लाख कुटुंबांना योजनेचा फायदा होईल तर औरंगाबादेतील १० लाख लोकांना विस्तारित योजनेचा फायदा होईल, अशी माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांनी दिली आहे.
औरंगाबाद शहरापासून साधारण ११७ किमी, श्रीगोंदा शहर आहे, याच श्रीगोंद्याच्या परिसरातून गुजरात ते विशाखापट्टणम मोठी गॅस लाईन होती. एक वॉल्व्ह होती. त्या व्हॉल्व्हमधून औरंगाबाद शहरापर्यंत आपण गॅस लाईन आणलेली आहे. २ मार्चला या योजनेचा शुभारंभ करत आहोत, असं भागवत कराड यांनी सांगितलं.
या योजनेच्या माध्यमातून ३३ ते ३५ टक्के स्वस्त गॅस मिळणार आहे. कंटिन्यू सप्लाय असल्याने महिलांना गॅस संपण्याचं टेन्शन राहणार नाही. तसंच सुरक्षितेतच्या बाबतीत महिलांना कोणतंही टेन्शन राहणार नाही. कारण हा नॅचरल गॅस असल्याने तो हवेत विरुन जाईल, अशी माहितीही कराड यांनी दिली.
प्रथमत: दोन लाख लोकांच्या घरात पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा करण्याचं आमचं ध्येय आहे. नंतर ही संख्या वाढून १० लाख लोकांपर्यंत गॅस पाईपलाईन पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. २०२४ ते २०२५ पर्यंत प्रकल्प पूर्णत्वास जाईल, अशी ग्वाही देखील कराड यांनी दिली.
आता गॅसची पाईपलाईन टाकून तुम्ही काय साध्य करणार आहात?, कुणाला फायदा होणार नाही. इतक्या वर्षांनंतर औरंगाबाद शहरातील रस्ते चांगले बनले असताना आता, पाणी पुरवठा योजनेसाठी रस्ते फोडणार, गॅस पाईपलाईनसाठी रस्ते फोडणार, त्यानंतर अंबानींच्या फाय-जी आठी रस्ते फोडणार आहेत. त्यामुळे कुठेतरी आत हे थांबायला पाहिजे आणि लोकांना उल्लू बनवण्याचा धंदा करु नये, म्हणून आम्ही हरदिपसिंह पुरी यांना विरोध करणार आहे, ते औरंगाबाद दौऱ्यावर आल्यावर त्यांना आम्ही काळे झेंडे दाखवणार आहोत आणि कार्यक्रमाच्या स्थळी जाऊन त्यांना जाब सुद्धा विचारणार असल्याचं जलील यांनी सांगितलं.