Russia-Ukraine War : स्टीलच्या दरात ऐतिहासिक उसळी, आजवरचा सर्वात मोठा दर

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । रशिया-युक्रेनच्या युद्धाची (Russia-Ukraine War) झळ आता अधिकच जाणवायला लागली असून या युद्धामुळे भारतातील स्टील उत्पादनावर (Steel) याचा मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. या युद्धजन्य परिस्थितीमुळे आज स्टीलच्या भावात ऐतिहासिक उसळी पाहायला मिळाली. आठ दिवसापूर्वी 54 हजार रुपये प्रतिटन असलेले स्टील आज 62 हजार 500 रुपये प्रतिटनावर पोहचलेत.

युक्रेन हा मॅग्नीज लोहखनिज याचा प्रमुख निर्यातदार देश असून या युद्धामुळे कच्च्या मालाची आवक मंदावली आहे, परिणामी आजच्या घडीला अधिकचे पैसे मोजून देखील कच्चा माल मिळणे अवघड झालंय, या शिवाय कोळसा गॅस आणि कच्च्या तेलाच्या भाववाढीचा एकत्रित परिणाम होऊन स्टील दरात ही प्रचंड भाववाढ झालीय. दरम्यान युद्ध परिस्थिती अशीच राहिली तर याचा थेट परिणाम स्टील उद्योगावर होऊन हे उद्योग बंद पडण्याची भीती देखील व्यक्त केली जातेय. अशी माहिती पोलाद स्टीलचे संचालक नितीन काबरा यांनी दिलीय.

युक्रेनने भारतीय विद्यार्थ्यांना ओलीस ठेवल्याचा दावा रशियाने केल्यानंतर आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने यावर स्पष्टीकरण दिले आहे. खारकीव्हमध्ये भारतीय विद्यार्थ्याला ओलीस ठेवले असल्याची माहिती मिळाली नसल्याचे परराष्ट्र मंत्र्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी म्हटले. एका निवदेनाद्वारे त्यांनी ही माहिती दिली. युक्रेन सरकारकडून भारतीय विद्यार्थ्यांना सहकार्य केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *