महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । सात दिवसांपासून युद्धासारख्या गंभीर परिस्थितीचा सामना करत 8 लाखांहून अधिक लोकांनी युक्रेन सोडले आहे. तिथे राहणाऱ्या लोकांना आता खाण्यापिण्याच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. वीज आणि पाणीपुरवठा बंद आहे. रुग्णालये आहेत, पण ती रिकामी आहेत. युक्रेनचे भारतातील राजदूत इगोर पोलिखा यांनी मानवतावादी मदतीची मागणी केली होती. यानंतर भारताने युक्रेनला मदतीचा हात पुढे केला आहे. भारताने बुधवारी युक्रेनला मदत दिली आहे. भारतीय हवाई दलाच्या C-17 ग्लोबमास्टर विमानाने 25 टन मदत सामग्री युक्रेनला पाठवली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने, एनडीआरएफच्या सहकार्याने, मानवतावादी मदतीसाठी आंतरराष्ट्रीय मानकांवर मदत सामग्रीचे पॅकेट तयार केले आहेत. यामध्ये 100 तंबू, 2500 ब्लँकेट, सर्जिकल ग्लोव्हज, आय गॉगल, पाणी साठवण्यासाठी लहाण टाक्या, स्लीपिंग मॅट, ताडपत्री, औषधे, पाण्याच्या बाटल्या, सर्जिकल मास्क, सोल्डर लॅम्प, सर्जिकल ग्लोव्हज आदी साहित्य पाठवण्यात आले आहे. सर्व पाकिटांवर भारताच्या तिरंग्याचे स्टिकर्स लावण्यात आले आहेत.
गाझियाबादमधील हिंडन एअरबेसवरून बुधवारी पहाटे चार वाजता सी-17 ग्लोबमास्टर रोमानियासाठी रवाना झाले. यामध्ये 15 टन मानवीय मदत सामग्रीची खेप ठेवण्यात आली होती. दुसरे विमान सकाळी 10.15 वाजता निघाले, त्यात 10 टन साहित्य पाठवण्यात आले. 25 टन मदत सामग्री पाठवण्यात आली आहे. सुमारे 25 टन मदत सामग्रीच्या दोन खेप तयार आहेत, ज्या केंद्र सरकारच्या सूचना प्राप्त होताच युक्रेनला पाठवल्या जातील.
गाझियाबादमध्ये NDRF ची 8 वी बटालियन आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या सूचनेनुसार एनडीआरएफच्या या बटालियनमध्ये सर्व मदत सामग्रीची खेप तयार करण्यात आली आहे. येथून त्यांना विशेष ट्रकने हिंडन एअरबेसवर नेले जात आहे. सुमारे 25 टन मदत सामग्रीच्या आणखी दोन खेप तयार आहेत, ज्या युक्रेनला पाठवल्या जाणार आहेत.