Share Market: शेअर मार्केटमध्ये अस्थिरता कायम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ३ मार्च । शेअर बाजारासाठी आजचा दिवस हा खूप अस्थिरतेचा दिसून आला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्समध्ये (Sensex) तेजी दिसून आली पण बाजार बंद होईपर्यंत त्यामध्ये पडझड झाली. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 366 अंकांनी तर निफ्टीही (Nifty० 108 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 0.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 55,102.68 वर पोहोचला. तर निफ्टीमध्ये 0.65 टक्क्यांची घसरण होऊन तो 16,498 वर पोहोचला आहे.

आज 1963 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1279 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 116 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही.

आज बाजार बंद होताना ऑटो, कॅपिटल गूड्स आणि बँक या क्षेत्रातल्या शेअर्समध्ये 1 ते 2 टक्क्यांची घसरण झाली. तर मेटल, आयटी, ऑईल अॅन्ड गॅस आणि उर्जा सेक्टरचे शेअर्स वधारल्याचं दिसून आलं आहे. BSE मिडकॅपमध्ये 0.6 टक्क्यांची तर स्मॉलकॅपमध्येही 0.35 टक्क्यांची घसरण झाली आहे.

मंगळवारी शेअर बाजारात UltraTech Cement, Asian Paints, HDFC Life, Shree Cements आणि Eicher Motors या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी घसरण झाली असून ONGC, UPL, Power Grid Corp, Wipro आणि Tech Mahindra या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये वाढ झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *