महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ४ मार्च । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू, विक्रमवीर शेन वॉर्न याचे पुस्तक ‘नो स्पिन’मध्ये त्याने ड्रेसिंग रुममधील अनेक धक्कादायक घटनांचा खुलासा करून खळबळ उडवून दिली होती. वॉर्नने आपल्या पुस्तकात ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ यावर आसूड ओढत त्याचा उल्लेख सर्वात ‘स्वार्थी क्रिकेटर’ असा केलेला.
वॉर्नने आपल्या पुस्तकात अनेक मोठे दावे केले आहेत. ऑस्ट्रेलिया संघाजी जेवढी पुजा केली जाते. यात जस्टीन लँगर, मॅथ्यू हेडन आणि अॅडम गिलख्रिस्टचाही समावेश आहे. यांच्याप्रति लोकांनमध्ये मोठी श्रद्धा होता पण माझ्याबाबतीत असे नव्हते. ते मला पसंद करत होते. परंतु प्रामाणिकपणे सांगितले तर निम्म्यापेक्षा जास्त वेळा ते मला मान खाली घालायला लावायचे. माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की कोण क्रिकेट संघाची कॅप विम्बल्डनमध्ये घालतो? हे लाजिरवाणे होते. मॉर्क वॉ ला देखील असेच वाटत होते. आणि मला हे सिद्ध करण्यासाठी बॅगी ग्रीन कॅपची आवश्यकता नाही. माझ्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून खेळणे महत्त्वाचे आहे आणि आम्हाला खेळताना पाहणाऱ्या लोकांसाठी हे किती महत्त्वाचं आहे.
स्टीव्ह वॉ बाबत वॉर्नने पुस्तकात म्हटले की, ‘फॉर्मात नसल्याचा दाखला देत मला 1999मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. याबाबत कर्णधाराने देखील माझी बाजू घेतली नाही. कर्णधाराचे समर्थन न मिळाल्याने आपल्याला कमी दाखवलं गेलं असं वॉर्नला वाटत होतं. या घटनेबाबत पुस्तकात वॉर्नने नमूद केले की, मी त्यावेळी संघाता उपकर्णधार होते आणि प्रमुख गोलंदाजही होतो. टुका (वॉ) ने संघाची निवड करण्याच्या बैठकीला सुरुवात केली. यावेळी प्रशिक्षक ज्येफ मार्श म्हणाले की, ‘वॉर्नी, मला नाही वाटत की तू पुढच्या कसोटीमध्ये खेळावं.’ यानंतर सर्वत्र शांतता झाली आणि मी का? असे विचारल्यावर ते म्हणाले की, मला नाही वाटत की तू खूप चांगली गोलंदाजी करत आहे. यावर मी म्हणालो की, हा, चांगला निर्णय आहे. तसेच मी असेही म्हणालो की, माझा खांदा शस्त्रक्रियेनंतर ठिक होण्यासाठी जास्त वेळ घेत आहे, परंतु मला असे अजिबात वाटत नव्हते, तसेच मी परत फॉर्मात येण्याच्या जवळ आहे. फॉर्म हळुहळू परत येत आहे आणि गोलंदाजीची लयही परत येईल. मला चिंता वाटत नाही.’
‘निराशा हा काही कठोर शब्द नाही, परंतु कठीण परिस्थितीमध्ये टुगा (वॉ)ने मला पाठिंबा दिला नाही आणि त्याने मला खजिल केलं. तो माझा चांगला मित्रही होता. कर्णधार झाल्यानंतर वॉ याची भूमिका अजिबात बदलली, असे वॉर्न म्हणतो. तसेच माझ्या कामगिरीव्यतिरिक्त इतरही काही घटना यावेळी घडल्या होत्या. मला वाटतं की ही चढाओढ होती. त्याने मला प्रत्येक गोष्टीवर टोकण्यास सुरुवात केली. माझी डाएट पाहाण्यास सांगितली. तसेच तो म्हणाला की, तू या गोष्टीवर जास्त लक्ष दे की तू आयुष्यात चांगला व्यक्ती कसा बनशील. यावर मी त्याला म्हणालो की, मित्रा तू तुझ्या बाबतीत विचार कर.’