भावपूर्ण श्रद्धांजली : फिरकीचा जादुगर शेन वॉर्न म्हणाला होता, माझ्या जीवनाचा डाव असता तर सचिनला बॅटिंगला पाठवले असते

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकी गोलंदाज राहिलेल्या शेन वॉर्नचे शुक्रवारी हृदयविकाराने निधन झाले. हा स्पिनचा जादूगार सध्या थायलंडमध्ये होता. तेथील व्हिलामध्ये तो बेशुद्ध आढळला. डॉक्टर प्रयत्न करूनही त्याला वाचवू शकले नाही. शेनचे आत्मचरित्र ‘नो स्पिन’ चांगलेच चर्चेत राहिले. त्याने लिहिले की, सचिन तेंडुलकर आणि लारा दोघेही सर्वात चांगले फलंदाज. कसोटीच्या शेवटच्या दिवशी शतकासाठी मला एखाद्या खेळाडूची निवड करायची असती तर तो ब्रायन लारा असता. परंतु माझ्या जीवनाचा डाव असता तर सचिनला बॅटिंगला पाठवले असते.

तू जवळ असायचास तेव्हा कुठला क्षण कंटाळवाणा नसायचा : सचिन
खूप दु:खी आहे… वॉर्नी, तुझी आठवण येईल. मैदानात असो की बाहेर, तू जवळ असायचास तेव्हा कुठलाही क्षण कंटाळवाणा होत नव्हता. -सचिन तेंडुलकर

कसोटीत ६०० आणि ७०० विकेटपर्यंत पोहोचणारा पहिला गोलंदाज होता.- स्पोर्ट‌्स वॉर्नने १९९३ च्या अॅशेसदरम्यान इंग्लंडच्या माइक गॅटिंगला ज्या चेंडूवर बोल्ड केले होते, तो क्रिकेट इतिहासातील सर्वोत्कृष्ट चेंडू म्हटला जातो. या चेंडूने जवळपास ९० अंशांचा टर्न घेऊन फलंदाजाला चारी मुंड्या चीत केले होते.

जडेजाला बसमधून उतरवले
आयपीएलमध्ये उशिरा आल्याने वॉर्नने रवींद्र जडेजाला बसमधून उतरवले होते.
१९९८ मध्ये सचिनने धुलाई केली होती तेव्हा “सचिन स्वप्नात येतो अन् षटकार मारतो,’ असे वॉर्न म्हणाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *