महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान मास्कोने सोशल मीडियावर बंदी घातली आहे. ही बंदी संपूर्ण देशभरात घालण्यात आली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सने रशियन कंपन्यांसोबत भेदभाव केल्याचा आरोप रशियाने केला आहे.
ऑक्टोबर 2020 मध्ये फेसबुकविरोधात भेदभाव केल्याचा आरोप करण्यात आला होता. अशा प्रकारच्या 26 तक्रारी फेसबुकविरोधात आल्या आहेत. ही माहिती रशियन सरकारची सेन्सॉरशिप एजेन्सी रोसकोम्नाडजोर यांनी ही माहिती दिली आहे. रशियन कंपन्यांसोबत फेसबुकने भेदभाव केल्याचा आरोप केला गेला आहे.
तर दुसरीकडे फेसबुकने या निर्णयावर प्रतिक्रिया दिली आहे. रशिया या निर्णयाने आपल्या नागरिकांना विश्वासार्ह माहितीपासून वंचित ठेवत असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे. दरम्यान, मायक्रोसॉफ्टनेही आपल्या नवीन उत्पादनाच्या विक्रीवर रशियात बंदी घातली आहे.