शेन वॉर्नची ‘ती’ वाईट सवय; मॅचआधी आटोपायचा हे काम

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । ऑस्ट्रेलियाचा महान लेग स्पिनर शेन वॉर्न याचं काल निधन झालं. वयाच्या 52 व्या वर्षी त्याने अखेरचा श्वास घेतला. यावेळी क्रिकेट जगतातील प्रत्येक व्यक्ती हळहळली. शेन वॉर्नने ऑस्ट्रेलियासाठी 1992 आणि 2007 मध्ये या 15 वर्षांच्या कालावधीत 708 विकेट्स घेतले. मात्र या काळात शेन वॉर्न अनेक विवादांचाही भाग राहिला होता.

शेन वॉर्नला या चुकीच्या गोष्टीची सवय
शेन वॉर्नचा सहकारी आणि ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइकल क्लार्कच्या म्हणण्यानुसार, शेन वॉर्नला एका चुकीची आणि वाईट सवय आहे. तो प्रत्येक सामन्यापूर्वी एक गोष्ट आवर्जून करतो. ती म्हणजे सामन्यापूर्वी सिगारेट पिणं पसंत करतो.

मायकल क्लार्क म्हणतो, वॉर्नला सिगारेट प्यायला खूप आवडते. त्याला मैदानाच्या आत सिगारेट आणू दिली नाही की तो ट्रेनिंग कॅम्पमध्ये न येण्याची धमकी द्यायचा.

एका अनसेंसर्ड पोडकास्टशी बोलताना क्लार्क म्हणाला होता की, शेन वॉर्न मैदानावर जाण्यापूर्वी सिगारेट प्यायचा. इतकंच नव्हे तर तो मैदानातच सिगारेट लपवण्याचा प्रयत्नही करायचा.

शेन वॉर्नने त्याच्या सामानात केवळ सिगारेट ठेवण्यासाठी एकदा तीन जोडी अंडरगार्मेंट्स आणि तीन जोडी मोजे काढून टाकले होते. आणि त्याजागी त्याने 6 सिगारेटची पाकिटं ठेवली होती, असंही एका इंटरव्ह्यूमध्ये क्लार्कने सांगितलंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *