कियाच्या येणार 14 इलेक्ट्रिक कार्स

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि ५ मार्च । भारतासह जगभरात अनेक देश हे बदलत्या जागतिक हवामानाच्या कारणामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्यावर भर देत पर्यावरण संवर्धन करण्याकडे वळत आहेत.

याचाच एक भाग म्हणून किया कंपनी येणाऱया काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या निर्मितीसाठी नवीन आराखडा आखत आहे. दक्षिण कोरियन ब्रँडने या अगोदरच 2026 पर्यंत 11 इलेक्ट्रिक वाहने बनविणार असल्याचे ध्येय निश्चित केले होते. यासोबत कंपनीने वर्ष 2027 पर्यंत 14 कार मॉडेल्स सादर करणार असल्याची घोषणा केली आहे.

2030 पर्यंत कियाने 112 अब्ज युनिट्सचे ध्येय प्राप्त करण्याची रचना आखली आहे. एकूण विक्रीत 30 टक्के हिस्सेदारी राहणार असल्याची माहिती आहे. कंपनीने प्रती वर्षी एक नवीन रचनेवर भर दिला जाणार आहे. यामध्ये दोन इलेक्ट्रिक पिकअप ट्रकसह एक एन्ट्रीसह बीईव्ही मॉडेल सादर करणार आहे.

भारतात इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन

ईव्हीसाठी एक रणनीती आखत असताना किया हे भारतात 2025 मध्ये प्रवेश करणार आहे. यामध्ये मध्यम आकारातील ईव्ही मॉडेल बाजारात उतरणार आहे. युरोपमध्ये लहान व मध्यम आकारातील उत्पादन 2025 पासून सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *